🏵 Khandoba Aarti Lyrics In Marathi
पंचानन हय वाहन सूर भूषित निळा |
खंडा मंडित दंडित दानव अवळीला |
मणी मल्ल मर्दूनी तो धूसर पिवळा |
करी कंकण बाशिंगे सुमनांच्या माळा ||
जयदेव जयदेव जय शिव मल्हारी ||
वारी दुर्जन असुरा भवदुस्तर तारी || १ ||
सुरवर सत्वर वर दे मजलागी देवा |
नाना नामे गाईल हि तुमची सेवा |
अघटीत गुण गावया वाटतसे हेवा |
फणीवर शिणला तेथे नर पामर केवा ||
जयदेव जयदेव जय शिव मल्हारी ||
वारी दुर्जन असुरा भवदुस्तर तारी || २ ||
रघुवरस्मरणी शंकर हृदयी निवाला |
तो हा मल्लांतक अवतार झाला |
यालागी आवडे भावे वर्णिला |
रामी रामदास जिवलग भेटला ||
जयदेव जयदेव जय शिव मल्हारी ||
वारी दुर्जन असुरा भवदुस्तर तारी || ३ ||