🏵 Saibaba Aarti Lyrics In Marathi
जोडूनियां कर चरणीं ठेविला माथा ।
परिसावी विनंती माझी सदगुरुनाथा ।। 1 ।।
असो नसो भाव आलों तूझिया ठाया ।
कृपादृष्टीं पाहें मजकडे सदगुरुराया ।। 2 ।।
अखंडित असावें ऐसें वाटतें पायी ।
सांडूनी संकोच ठाव थोडासा देईं ।। 3 ।।
तुका म्हणे देवा माझी वेडीवांकुडी ।
नामें भवपाश हातीं आपुल्या तोड़ी ।। 4 ।।