🏵 Saibaba Aarti Lyrics In Marathi
घेउनियां पंचारती । करुं बाबांसी आरती ।।
करुं साईसी । करुं बाबांसी आरती ।। 1 ।।
उठा उठा हो बांधव । ओंवाळूं हा रमाधव ।।
साई रमाधव। ओंवाळूं हा रमाधव ।। 2 ।।
करुनीयां स्थीर मन । पाहूं गंभीर हें ध्यान ।।
साईचें हें ध्यान । पाहूं गंभीर हें ध्यान ।। 3 ।।
कृष्णनाथा दत्तसाई । जडो चित्त तुझे पायीं ।।
चित्त देवा पायीं । जडो चित्त तुझे पायीं ।। 4 ।।