🏵 Saibaba Aarti Lyrics In Marathi
भक्तीचिया पोटीं बोध कांकडा ज्योती ।
पंचप्राण जीवें भावें ओवाळूं आरती ।। 1 ।।
ओंवाळूं आरती माइया पंढरीनाथा ।
दोन्ही कर जोडोनी चरणीं ठेविला माथा ।। ध्रु ।।
काय महिमा वर्णूं आतां सांगणे किती ।
कोटी ब्रहमहत्या मुख पाहतां जाती ।। 2 ।।
राई रखुमाबाई उभ्या दोघी दो बाहीं ।
मयूरपिच्छ चामरें ढाळिति ठायींचे ठायीं ।। 3 ।।
तुका म्हणे दीप घेउनि उन्मनीत शोभा ।
विचेवरी उभा दिसे लावण्यगाभा ।। 4 ।।